Fri, Feb 22, 2019 14:16होमपेज › Belgaon › बेळगावचे दाम्पत्य ठार

बेळगावचे दाम्पत्य ठार

Published On: Oct 12 2018 1:04AM | Last Updated: Oct 13 2018 1:15AMकारवार : प्रतिनिधी

सिमेंट भरलेल्या भरधाव ट्रकने मागून कारला धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमध्ये असलेले बेळगावचे दाम्पत्य जागीच ठार झाले,  तर एक महिला गंभीर जखमी झाली. राष्ट्रीय महामार्ग 66वर अंकोल्याजवळ मादमनगेरी फाट्यावर बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. 

सुरेश लक्ष्मण रायकर (वय 65) व चंद्रकला सुरेश रायकर (वय 60) अशी मृत पती-पत्नीची नावे असून ते बेळगाव-नेहरूनगराचे रहिवासी होते. अपघातात भारती प्रभाकर वेर्णेकर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कार अंकोल्याहून  मंगळूरच्या दिशेने निघाली होती. ट्रक भरधाव असल्यामुळे हा अपघात घडल्याचे सकृतदर्शनी दिसते. अपघाताचे वृत्त समजाताच पोलिस उपनिरीक्षक श्रीधर व सहकार्यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. अंकोला पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.