Thu, Dec 12, 2019 22:12होमपेज › Belgaon › बंगळुरात स्फोट; एक ठार

बंगळुरात स्फोट; एक ठार

Published On: May 20 2019 1:23AM | Last Updated: May 19 2019 11:38PM
बंगळूर : प्रतिनिधी

शक्तिशाली स्फोटामध्ये एकजण ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 9.15 च्या सुमारास राजराजेश्‍वरीनगरात घडली. काँग्रेस आमदार मुनीरत्न नायडू यांच्या कार्यालयानजीक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, चित्रपट चित्रीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या स्फोटकाचा वापर यासाठी करण्यात आल्याचे समजते.

व्यंकटेश (वय 45) असे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे. शक्तीशाली स्फोटामुळे त्यांच्या शरीराचे तुकडे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आमदारांच्या कार्यालयाच्या इमारतीसह शेजारील इमारतीच्या भिंतींना तडे गेले. खिडक्यांच्या काचा फुटल्या, दरवाजाचेही नुकसान झाले. पोलिस अधिकार्‍यांनी श्‍वानपथक, बॉम्ब निकामी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. परिसरात कसून तपास केला. पण, कोणत्याही ठिकाणी स्फोटके सापडली नाहीत.