Mon, Sep 16, 2019 05:30होमपेज › Belgaon › निपाणीत दुचाकीच्या धडकेत महिला ठार

निपाणीत दुचाकीच्या धडकेत महिला ठार

Published On: May 10 2019 1:59AM | Last Updated: May 10 2019 12:01AM
निपाणी : प्रतिनिधी

निपाणी-चिकोडी मार्गावर अशोकनगर क्रॉस वळणाजवळ पादचारी महिलेला  दुचाकीस्वाराने धडक दिल्याने महिला ठार झाली. कल्याणी मलकाप्पा केस्ती (वय 65, रा.माणिकनगर, निपाणी) असे त्या महिलेचे नाव आहे. घटनेची नोंद बसवेश्‍वर चौक स्थानक पोलिसांत झाली आहे.

कल्याणी  बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घराकडून बसस्थानकाकडे चालत जात होत्या. अशोकनगर वळणाजवळ मागून आलेल्या दुचाकीस्वार गुरूप्रसाद दगडू गेजगे (रा. चिखलव्हाळ) याने त्यांना धडक दिली. त्यामुळे कल्याणी रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कणेरीवाडी येथील सिध्दगिरी मठ रूग्णालयात दाखल केले असता रात्री 10 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कल्याणी यांचा भाऊ प्रकाश केस्ती यांनी  गेजगे याच्या विरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक वसंत बंडगार करत आहेत.  त्यांच्या पश्‍चात दोन भाऊ,  भावजय असा परिवार आहे.