Sat, Sep 21, 2019 07:05होमपेज › Belgaon › बेनकनहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्ष पदच्युत

बेनकनहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्ष पदच्युत

Published On: Apr 09 2019 1:55AM | Last Updated: Apr 09 2019 12:08AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेनकनहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्षा रेहाना बेळगावकर यांनी पदाचा दुरुपयोग करून शेतजमिनीत बहुमजली इमारत उभारण्यास मंजुरी दिली. हा बेकायदेशीर प्रकार असून त्यांना अध्यक्षपदावरून पदच्युत्त करण्याबरोबर सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश राज्यपालांच्या वतीने ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याचे उपसंचालक मुबारक अहमद यांनी बजावला आहे. 

अध्यक्षा बेळगावकर यांच्यावर बहुमजली इमारत बांधण्यास मंजुरी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  शहरापासून जवळ असल्याने बेनकनहळ्ळी परिसरात अनेक बहुमजली इमारती उभारण्यात येत आहेत. यासाठी आवश्यक मंजुरी न घेता ग्रा. पं. कडून भ्रष्टाचार सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती.

अध्यक्ष बेळगावकर यांनी सर्व्हे क्र. 59/7  मधील 2 एकर 34 गुंठे आणि सर्वे क्र. 70/2 मधील 10 गुंठे शेतजमिनीवर कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना, बिगरशेती म्हणून नोंद नसताना इमारतीसाठी मंजुरी देण्याचा ठराव 21 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या ग्रामसभेत केला. शेतजमीन बिगरशेती नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची आवश्यकता असते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कर्नाटक ग्रामस्वराज आणि पंचायतराज अधिनियम,1993 च्या 48 (4) आणि 43 (ए) कलमान्वये कारवाई करण्यात आली.

भाजप असो व काँग्रेस; दोन्ही पक्षांनी सीमावासियांच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिलेले नाही. समितीने आता जे अर्ज भरले आहेत, ते त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी. त्यामुळे कोण काय म्हणतं, याला फारसे महत्व नाही.  समितीने सीमाप्रश्‍न देश पातळीवर पोहोचण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. 
-दीपक दळवी, अध्यक्ष, मए समिती