Sat, Sep 21, 2019 07:21होमपेज › Belgaon › खुल्या तारेचा बसला वायरमनलाच ‘शॉक’ 

खुल्या तारेचा बसला वायरमनलाच ‘शॉक’ 

Published On: Mar 27 2019 1:51AM | Last Updated: Mar 26 2019 11:09PM
बेळगाव : प्रतिनिधी  

रस्त्याकडेला उभारलेल्या जाहिरात फलकाची विद्युत प्रवाहित तार बाहेर येऊन दुचाकीला स्पर्श झाला. त्यामुळे दुचाकीवरील वायरमन पत्नीसह उडून पडले. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास कॉलेज रोडवरील आरएलएस कॉलेजच्या समोर असलेल्या विजय बेकर्ससमोर ही घटना घडली. 

ज्यांना हा शॉक लागला ते वायरमन असून, विजय बेकर्समधील बंद पडलेली वीज सुरू करण्यासाठी ते आले होते. मंगळवारी सातच्या सुमारास कॉलेज रोडवरील विजय बेकर्ससमोर  ओपो कंपनीच्या जाहिरात बॉक्समधील वीजप्रवाहित तार उघड्यावर पडली होती, याची कोणालाच कल्पना नव्हती. नेमके याचवेळी हट्टीहोळी गल्ली शहापूर येथील संतोष कणबर्गी हे वायरमन असून  ते  विजय बेकर्समधील वीज दुरुस्तीसाठी आले होते. सोबत त्यांची पत्नीही होती. जेव्हा त्यांनी रस्त्यावरून पदपथावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केला तेव्हा विद्युतभारित तारेचा दुचाकीच्या चाकाला स्पर्श झाला. त्यामुळे जोराचा धक्का बसून ते पत्नीसह बाजूला फेकले गेले. आपण कसे काय पडलो, याचे त्यांनाही आश्‍चर्य वाटले. त्यानंतर शंका आल्याने तपासणी केली असता त्यातून वीज प्रवाह सुरू असल्याचे दिसून आले.