Sat, Sep 21, 2019 06:33होमपेज › Belgaon › बेळगावात धार्मिक तणाव, खडक गल्लीत दगडफेक

बेळगावात धार्मिक तणाव, खडक गल्लीत दगडफेक

Published On: Dec 19 2017 12:06AM | Last Updated: Dec 19 2017 2:25AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

धार्मिक तणावाने ग्रस्त असलेल्या बेळगावात सोमवारी रात्री पुन्हा धार्मिक तणाव उसळला. चांदू गल्ली, खडक गल्ली, जालगार गल्ली परिसरात दोन गटांत तुफान दगडफेक झाली. तसेच काही वाहनांची जाळपोळ करण्यात झाली.

घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या मंगळवारी चांदू गल्लीत अय्यप्पा स्वामी पूजा आयोजिण्यात आली आहे. त्याची तयारी सुरु असताना एका गटाने दगडफेक सुरु केली. रात्री अकराच्या सुमारास दगडफेक सुरु झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानेही दगडफेक सुरु केली. पथदीप, रस्त्यावरील वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. नंतर वाहनांना आगी लावण्यात आल्या. सुमारे २० मिनिटे हा प्रकार सुरु होता. जालगार गल्ली, चांदू गल्ली, दरबार गल्ली, खडक गल्ली परिसर तणावाखाली आहे.

पत्रकारांवरही हल्ला
दंगल सुरु झाल्याचे कळताच घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल पत्रकार व छायाचित्रकारांवर युवकांच्या एका गटाने हल्ला केला. काही कॅमेरे फोडण्यात आले.

पोलिस उशिरा
दंगलीची माहिती मिळाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने पोलिस घटनास्थळी पोचले. डीसीपी अमरनाथ रेड्डी, खडे बाजार निरीक्षक यू. एच. सातेनहळ्ळी यांचेसह फौजफोटो दाखल झाला होता. एका पोलिस वाहनावरही दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांनी धरपकड व नाकाबंदी सुरु केली.