Tue, Aug 20, 2019 09:22होमपेज › Belgaon › पाणी मिळविण्यासाठी महिला उतरताहेत धोकादायक खड्ड्यात

पाणी मिळविण्यासाठी महिला उतरताहेत धोकादायक खड्ड्यात

Published On: Jun 09 2019 1:23AM | Last Updated: Jun 08 2019 11:48PM
दांडेली ः वार्ताहर

मातकर्णी गावात पाण्याची गंभीर समस्या आहे. सरकारची 10 लाख रुपयांची पाणी योजना तीन दिवसही चालली नाही. टँकरद्वारे गावाला पाणी पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले आहे पण अद्याप गावात टँकर आले नाहीत.

मातकर्णी गाव हे कुंभारवाडा ग्रा. पं. व्याप्तीमधील तीनशे लोकवस्तीचे ाव आहे. या गावात सध्या भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. खड्डा वजा विहीर खोदून त्यातून पाणी घेतले जात आहे. खड्ड्यात उतरून महिला जीवावर उदार होत पाणी भरून घेत आहेत. यात शाळकरी मुलीसुद्धा आपल्या आईला मदत करण्यासाठी खड्ड्यात उतरून पाणी भरून देत आहेत.

ग्रामपंचायत सदस्या रेश्मा वेळीप यांनी तालुका प्रशासन व पाणी पुरवठा विभाग हे कुचकामी आहेत. टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्‍वासन जोयडा तालुका प्रशासनाने दिले आहे, पण गेल्या पंधरा दिवसांपासून गावात एक टँकरसुद्धा आलेला नाही. प्रशासन आश्‍वासन देऊन वेळ मारून नेत आहे. गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत सरकारकडून 10 लाख रुपये मंजूर केले. काम पूर्ण झाले पण अजूनपर्यंत गावकर्‍यांना एक थेंब पाणी मिळाले नाही.