Mon, Dec 09, 2019 11:21होमपेज › Belgaon › गावागावांतून घुमला विठूनामाचा गजर

गावागावांतून घुमला विठूनामाचा गजर

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 12 2019 9:17PM
बेळगाव : प्रतिनिधी

विठ्ठल नामाचा घुमणारा गजर, टाळ, मृदंगाच्या तालावर फडकणारी भगवी पताका, भजन, कीर्तन, दिंडीचे ठिकठिकाणी करण्यात आलेले आयोजन अशा भक्मिमय वातावरणात  तालुक्यातील गावागावांतून शुक्रवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.

विठ्ठल-रखुमाई मंदिरात सकाळपासून भाविकांनी हजेरी लावली होती. वारकरी मंडळीकडून भजन, कीर्तन, दिंडीचे आयोजन केले  होते. यामध्ये प्राथमिक शाळा, हायस्कूलच्यावतीने सहभाग घेतला होता. चिमुकल्यांनी संताच्या वेशात दिंडीमध्ये सहभाग घेऊन गावातून फेरी काढली.सुळगा प्राथमिक शाळा सुळगा येथील पूर्ण प्राथमिक मराठी शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त गावातून दिंडी काढण्यात आली.  यामध्ये विद्यार्थ्यांना संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, संत मुक्ताई, गोरा कुंभार, विठ्ठल-रखुमाई यांच्या वेशात सजविण्यात आले होते. शाळेपासून दिंडीला प्राधान्य झाली. गावांतील प्रमुख मार्गावरून दिंडी नेण्यात आली. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थीनींनी पारंपारिक वेशात सहभाग घेतला होता. डोक्यावर मंगलकलश घेऊन सहभाग घेतला होता. गावांतील सुहासिनीकडून दिंडीचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी एल. एस. चांदीलकर, एम. आर. कोवाडकर, जे. एन. खानाजी, व्ही. एस. मोटराचे, व्ही. आय. गुंजटकर, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य गणपत कलखांबकर, टोपाण्णा पाटील, जी. एस. गावडे आदी सहभागी झाले होते.

कुद्रेमानी मंदिरात गर्दी

कुद्रेमानी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. सकाळपासून भजन कार्यक्रमाचे आयोजन वारकरी मंडळीकडून करण्यात आले होते. यावेळी भाविकांची गर्दी होती. रात्री भजन, कीर्तन कार्यक्रम पार पडले. 

बेळगुंदी, उचगावात भक्तिमय वातावरण

बेळगुंदी येथे आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विठ्ठल-रखुमाई मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मार्कंडेय हायस्कूल कंग्राळी

विद्यार्थ्यांना मराठी संस्कृतीची जपणूक  व्हावी  व परंपरेची जाणीव करुन देण्यााच्या उद्देशाने कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय हायस्कूलतर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. मार्कंडेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आम. बी. आय. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हायस्कूलपासून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. विठ्ठल  नामाचा जयघोष, टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी लक्षवेधी दिंडी काढून ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. वारकर्‍यांची वेशभूषा, कपाळी गंध, खांद्यावर पालखी, मुखात  विठ्ठल नामाचा  गजर करत दिंडी काढण्यात आली.  विद्यार्थिनींनी पारंपारिक वेषात डोक्यावर मंगलकलश घेऊन सहभाग घेतला होता. छ. शिवाजी महाराज चौकात फुगडी घालून गवळणी, अभंग सादर करण्यात आले.यामध्ये भजनी मंडळाने ही सहभाग घेतला होता. गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात भजन, कीर्तन आयोजन केले होते. गावातील मंदिरांना भेटी देऊन पूजा करण्यात आली. हायस्कूलमध्ये दिंडीची सांगता झाली.

मुख्याध्यापिका एन. जे. चौगुले, आर. एम. अष्टेकर, एस. एस. बराटे, एस. एस. मुतगेकर, बी. के.पाऊसकर, डी. ए. पाटील, एम. बी. सोगली, कर्मचारी पी. बी. पाटील, एम. बी. मळगली सहभागी झाले 
होते.