होमपेज › Belgaon › १५ जूनपासून कृत्रिम पाऊस पाडणार

१५ जूनपासून कृत्रिम पाऊस पाडणार

Published On: May 23 2019 1:40AM | Last Updated: May 22 2019 11:42PM
बंगळूर : प्रतिनिधी

हुबळी आणि बंगळूर येथून 15 जूनपासून कृत्रिम पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती कृषी मंत्री एन. एच. शिवशंकर रेड्डी यांनी दिली आहे.येेथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदा मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण 45 टक्के कमी झाले आहे. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. भूजल पातळी घटली आहे. चारा समस्याही तीव्र बनली आहे. यामुळे कृत्रिम पावसासाठी आवश्यक तयारी केली जात असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.