Thu, Dec 12, 2019 22:13होमपेज › Belgaon › मंदिरात चोरी; दीड लाखांचे दागिने लंपास

मंदिरात चोरी; दीड लाखांचे दागिने लंपास

Published On: Oct 29 2018 12:55AM | Last Updated: Oct 29 2018 12:20AMचिकोडी : प्रतिनिधी

येथील भीमनगरातील मरगुबाई मंदिराचे कुलूप तोडून तिजोरीतील 1.50 लाखाच्या दागिने लंपास केले. तसेच  चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री चोरट्यांनी मरगूबाई मंदिरच्या प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून प्रवेश केला. गाभार्‍यातील कुलूप तोडून तिजोरीतील  7.5 ग्रॅमची 4 मंगळसूत्र, सोन्याची चार डोळे, 27 जोडी चांदीची डोळे, 4  चांदीचे किरीट,  2 ग्रॅम सोन्याची बोरमाळ, एक नथ असा सुमारे 1.50 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

चोरट्यांनी मंदिरात असलेली देणगीपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर येथून जवळच असलेल्या सुधाकर गड्डे यांचे बंद जुने घर देखील फोडण्यात आले.  तेथे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. तसेच शहरातील मुल्ला प्लॉटमधील एका घर फोडल्याचे समजते. मरगूबाई मंदिराचे पुजारी जितेंद्र दामन्नवर यांची सून कल्पना दामन्नवर नेहमीप्रमाणे सकाळी 6.30 वा. स्वच्छतेसाठी मंदिरात गेल्या असता सदर घटना उघडकीस आली. त्यांनीं याची माहिती जितेंद्र यांना दिली. याबाबत समजताच मंदिराचे चेअरमन अशोक भंडारकर, शशिकांत कांबळे, तुकाराम घट्टी, बसवराज ढाके दाखल झाले. चिकोडी एएसपी मिथुनकुमार, पीएसआय संगमेश होसमनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुपारी बेळगाव येथील श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी चिकोडी पोलिस स्थानकात नोंद झाली आहे.