Sun, Jul 12, 2020 21:12होमपेज › Belgaon › भामट्यांना फिल्मी स्टाईलने अटक 

भामट्यांना फिल्मी स्टाईलने अटक 

Published On: Jun 26 2019 1:38AM | Last Updated: Jun 26 2019 12:23AM
बेळगाव : प्रतिनिधी

रस्त्यात अडवून तरुणाला लुटून पळून जाणार्‍या तिघा भामट्यांना शहापूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अवघ्या दोन तासांत पकडले. सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जुन्या पीबी रोडवरील येडियुराप्पा मार्गाजवळील उप्पार गल्लीच्या क्रॉसजवळ ही घटना घडली. 

राहुल गुरूनाथ नायकवडी (24, नवीगल्ली, शहापूर), अक्षय प्रदीप हेरेकर (21) व आकाश प्रदीप हेरेकर (21, दोघेही रा. मारुती गल्ली, खासबाग) अशी या भामट्यांची नावे आहेत. यापैकी अक्षय व आकाश हे जुळे भाऊ आहेत. 
सन्नकल्लाप्पा बसवंत जनगौड (27, रा. अलारवाड, ता. बेळगाव) हा तरुण येथील गोमटेश विद्यापीठात काम संपवून दुचाकीवरून घरी निघाला होता. यावेळी जुन्या पीबी रोडवरील दोघांनी सन्नकल्लाप्पाची दुचाकी अडविली. यापैकी एकाने तोंडावर कापड बांधले होते. त्याने चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील 14,500 रूपये किंमतीचा मोबाईल व दोन हजाराची रोकड काढून घेतली. मोबाईल व रोकड घेऊन तिघांनी येथून पोबारा केला. दोघांनी शेतवडीतून पळण्यास प्रारंभ केला. निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी वाहनातून उतरून सुमारे अर्धा किलोमीटर भामट्यांचा  पाठलाग करून जेरबंद केले.