Mon, Dec 09, 2019 10:58होमपेज › Belgaon › शिवारात पुन्हा तरसाचा वावर

शिवारात पुन्हा तरसाचा वावर

Published On: Jun 24 2019 1:29AM | Last Updated: Jun 24 2019 12:31AM
बेळगाव : प्रतिनिधी

उचगाव - कोवाड मार्गावर बेकिनकेरे, होसूर, बुक्‍किहाळ, कल्याणपूर या गावच्या शिवारात तरस या जंगली प्राण्याचा वावर आहे. रविवारी पहाटे कल्याणपूर (ता. चंदगड) येथे मारुती अप्पय्या हगिदळे (रा. कागणी) यांच्या शेतात ठसे आढळले. या प्रकारामुळे मात्र शेतकर्‍यांत बिबट्या की तरस अशी चर्चा असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेकिनकेरे, होसूर, कल्याणपूर या शिवारात सहा महिन्यापासून तरसाचा वावर आहे. आठ दिवसांपूर्वी कल्याणपूर येथील महादेव रामा पाटील यांच्या शेतात या प्राण्याचे ठसे आढळले आहेत. सध्या पेरणीसह शेतीची कामे सुरु आहेत. मात्र तरस ऊस पिकात लपून बसण्याची शक्यता असल्याने ऊस पिकाची भांगलण करण्याचे काम शेतकरी टाळत आहेत. चार महिन्यापूर्वी कल्याणपूर फाटा, होसूर येथे कर्नाटक हद्दीवर अनेकवेळा याचे दर्शन झाले आहे.

बेकिनकेरे, होसूर परिसरातील अनेक भटकी कुत्री गायब आहेत. तरस या प्राण्याकडून भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडल्याची शक्यता वनखात्याच्या अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली आहे. अतिवाड फाटा येथे काही हॉटेलमधून टाकाऊ मास टाकले जाते. या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठा आहे.

तरस हा प्राणी केसाळ असून, सहजासहज मनुष्यावर हल्‍ला करत नाही. तो एकाच ठिकाणी राहत नसून काही दिवसात अन्यत्र जाईल. याबाबत कोणीही अफवा पसरू नये.-अमोल शिंदे, वनपाल, महिपाळगड क्षेत्र