Tue, Jul 07, 2020 09:32होमपेज › Belgaon › आमच्या वाट्याला अच्छे दिन कधी? 

आमच्या वाट्याला अच्छे दिन कधी? 

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 18 2018 10:34PMबेळगाव : संदीप तारिहाळकर 

देशाच्या स्वातंत्र्याची सत्तरी उलटली तरी भटका समाज अजूनही पारतंत्र्याच्या कळा सोसत आहे. ‘ना घर, ना दार’ अशा अवस्थेत धावड, धनगर, नंदीबैलवाल्या समाजाची भटकंती सुरू आहे. देशात वाय-फायच्या, स्मार्ट सिटीच्या चर्चा सुरू आहेत. मात्र आमचा समाज हाय-फाय  कधी होणार, आमच्या वाट्याला अच्छे दिन कधी येणार, असा सवाल उव्दिग्न सवाल समाजातील कर्ते करतात. समाजातील निवडक प्रतिक्रिया.... 

करमणुकीचे तंत्र बदलले : विकास घोरपडे 

सांग सांग भोलानाथ... पाऊस पडेल काय,  अशी आरोळी ठोकत बालचमू भोलानाथाच्या पाठीमागे धावायचे. ग्रामीण भागात दरवर्षी हे चित्र हमखास पाहावयास मिळायचे. आता करमणुकीची साधनेही बदलली आणि आमचे दिवसही. नंदीबैल सोबतीला घेऊन समोर पावसाचे भाकित करून बालकांसह मोठ्यांचे मनोरंजन करून, समोरील व्यक्तीचे भविष्य सांगायचे, हे आता विस्मृतीत गेले आहे. आमची शेती नाही. त्यामुळे नवा रोजगार शोधणे आमच्यासाठी आव्हानच आहे, अशी प्रतिक्रिया फिरस्तीवर असणारे बारामती येथील नंदीबैलवाले समाजाचे विलास घोरपडे यांनी दिली. 

शासनानेच आम्हाला रोजगार द्यावा 

बाराबलुतेदार पद्धत प्राचीन काळापासून आहे. मात्र बदलत्या  युगात पुरेसे काम मिळत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विळे, खुरपी, शेती अवजारे तयार होत आहेत. आता काही शेतकरीच आमच्याकडून हत्यारे तयार करून घेतात. यामुळे रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पिढ्यान पिढ्या भटकंतीचा धंदा नकोसा झाला आहे. आमच्या मुलांच्या हाती खडू, पेन्सिलऐवजी भाता आणि घन येत आहे. आमच्या उन्नतीसाठी मायबाप सरकारनेच ठोस धोरण आखावे. जेणेकरून भावी पिढ्या मुख्य प्रवाहात येतील. ‘आज इथे तर उद्या तिथे’ हा उघड्यावरचा संसार बंद व्हावा, यासाठी सामाजिक चळवळीही आता बोथट झाल्याचा खेद होसूर उचगाव मार्गावरील धावड कारागीर युवराज सूर्यवंशी दाम्पत्याने व्यक्त केला. 

वन्यप्राण्यांशी संघर्ष कायम : यल्लाप्पा कुरबूर 

पूर्वी पर्जन्यमान मुबलक असायचे. यामुळे सर्वत्र चाराही भरपूर असायचा. अलिकडे चार्‍याची टंचाई भेडसावते आहे. चार्‍यासाठी  हजारो किलोमीटरची भटकंती करावी लागते. शेतीच्या घटत्या क्षेत्राने चाराटंचाई होत आहे. यातच जंगलावर अतिक्रमण केल्याने राना-वनात  वन्य प्राण्यांशी संघर्ष करावा लागतो. समाजाच्या उन्नतीसाठी सरकारने स्वतंत्र महामंडळ नेमावे, अशी मागणी यल्लाप्पा कुरबूर (होनगा) यांनी मण्णूर येथील रानोमाळ भटकंतीवेळी केली.