Thu, Dec 05, 2019 20:47होमपेज › Belgaon › भिवशी येथे विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

भिवशी येथे विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Published On: Jun 03 2019 1:42AM | Last Updated: Jun 03 2019 1:42AM
निपाणी : वेदगंगा नदी पात्रात बुडून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी भिवशी येथे घडली. अमन उर्फ यश भास्कर कांबळे (आवटे) असे मृताचे नाव असून घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.

अमन याचे कुटुंबीय शेती व्यावसायिक असून त्याचे वडील इचलकरंजी येथे यंत्रमाग कामगार म्हणून काम करतात.  रविवारी सकाळी 8 च्या सुमारास अमन कुटुंबीयांसमवेत नदीवर कपडे धुण्यासाठी गेला होता. दरम्यान, अमन  पोहण्यासाठी पाण्यात उतरला पण त्याला व्यवस्थित पोहता येत नसल्याने तो बुडला. 

नदीवर गर्दी होती. त्यामुळे बराच वेळ ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. थोड्या वेळाने अमन नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता अमन घाटाच्या पायरीजवळ बुडाल्याचे दिसले. कुटुंबीयांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून सौंदलगा येथील खासगी रूग्णालयात हलविले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अमन हा गावातील शाळेत पाचवी इयत्तेत उत्तीर्ण होऊन सहावीत गेला होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.