Tue, Sep 17, 2019 04:32होमपेज › Belgaon › रिंगरोडविरोधी महामोर्चा जागृतीला वेग

रिंगरोडविरोधी महामोर्चा जागृतीला वेग

Published On: Feb 22 2019 1:58AM | Last Updated: Feb 21 2019 8:46PM
बेळगाव: प्रतिनिधी

रिंगरोडविरोधात तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण होत असून दि. 28 रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी जागृती मोहीम जोमात सुरू आहे. मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.

तालुक्यातील पूर्व आणि पश्‍चिम भागातून रिंगरोड करण्यात येणार आहे. यासाठी महसूल खाते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्यावतीने नोटीस बजावली आहे. रिंगरोडसाठी 1200 एकरहून अधिक जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविरोधात शेतकरी एकवटत आहे. भूसंपादन रद्द करावे, यासाठी तालुका म.ए. समितीच्यावतीने 28 मार्च रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चाची जागृती शेतकर्‍यांमध्ये जोमाने सुरू आहे. बेळगुंदी, वाघवडे, संतिबस्तवाड, मुतगा, येळ्ळूर भागात बैठका झाल्या असून शुक्रवारी धामणे येथे शेतकर्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

येळ्ळूर ग्रा. पं. मध्ये रिंगरोडच्या विरोधात ठराव पारित केला आहे. ता. पं. च्या सर्वसाधारण बैठकीतदेखील रिगंरोडविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. शेतकर्‍यांसाठी अन्यायी ठरणारा रिंगरोड रद्द करावा, अशी मागणी यातून जोर धरत आहे.महामोर्चाची सुरुवात सरदार्स मैदानातून होणार आहे. यामध्ये शेतकरी बैलगाडी, जनावरे, लहान मुले यांच्यासह सहभागी होणार आहे. प्रशासनाने रिंगरोडचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. रिंगरोडबरोबरच हलगा-मच्छे बायपास रस्त्याला देखील विरोधी केला जाणार आहे. याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. यामुळे मच्छे, हलगा, शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरातील शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. 

सोशल मीडियावर प्रचार 

रिंगरोडबाबतची जागृती सोशल मीडियावर युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी फेसबुक, व्हाटसअ‍ॅप सारख्या साधनांचा वापर केला जात आहे. शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यात येत आहे. यामुळे तालुक्यात महामोर्चाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex