Sat, Dec 14, 2019 05:38होमपेज › Belgaon › सोशल मीडियावर रंगले प्रचारयुद्ध

सोशल मीडियावर रंगले प्रचारयुद्ध

Published On: Apr 11 2019 2:00AM | Last Updated: Apr 10 2019 9:33PM
बेळगाव : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीच्या युद्धात हायटेक प्रचार तंत्र-यंत्राचा वापर सर्वच पक्षांनी मुक्त हस्ते सुरु केला आहे.  बेळगाव लोकसभा मतदार क्षेत्रात भाजपने 2 हजार 200 व्हॉट्स अप ग्रुप तयार केले आहेत.काँग्रेस व म.ए.समितीने देखील सोशल मीडियावर प्रचाराला गती दिली आहे. बेळगाव मतदारसंघातील प्रचारासाठी भाजपने सोशल मीडिया प्रचार कक्ष निर्माण केला आहे. त्यामार्फत प्रचार सुरु आहे. काँग्रेस, भाजप व समितीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअप यासारख्या सोशल नेटवर्कींग साईटचा आधार घेतलेला दिसून येत आहे. 

सोशल मिडियाचा वापर करण्यामध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी या अधुनिक मार्गाची कास धरली आहे. प्रचाराचा हा मार्ग त्यांना उच्चभ्रू जनतेची मते मिळविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. सोशल साईट्सच्या माध्यमातून आपण केलेली कार्ये आणि भविष्यकाळातील कार्याचा आढावा जनतेसमोर मांडण्यात येत आहे. सोशल मडियाने गेल्या काही वर्षात निवडणुकांमध्ये क्रांती केल्याचे दिसून येते. 

सोशल माध्यमाद्वारे मी किती श्रेष्ट आणि मी किती कामे केलेली आहेत. याचा सफाटाच लावलेला आहे. तर काही जण आपली कार्यपद्धती आणि भविष्यातील ध्येय प्रसिद्ध करीत आहेत. काही उमेदवारांनी सोशल माध्यमांच्या आधारे मतदारसंघातील जनतेचे जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न  केला आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी यंदा सोशल नेटवर्कींग बरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून वॉर सुरु झाले आहेत.