Sun, Dec 15, 2019 03:14होमपेज › Belgaon › बंगळुरात दरोडे घालणारी सांगलीची टोळी जेरबंद

बंगळुरात दरोडे घालणारी सांगलीची टोळी जेरबंद

Published On: Mar 24 2018 1:46AM | Last Updated: Mar 24 2018 12:26AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्वेलरी स्टोअर्सवर दरोडे घालून दागिन्यांची लूट करणार्‍या सांगली जिल्ह्यातील चौघांच्या दरोडेखोरांच्या टोळीला बंगळूर शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे सुवर्णालंकार आणि अन्य ऐवज जप्त केला आहे.

पोलिस उपायुक्‍त चेतनसिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहराबाहेरील देवगनहळ्ळी भागात या टोळीला अटक केली. या वर्षाच्या प्रारंभीच या टोळीने बंगळूर शहरातील प्रख्यात ज्वेलरी स्टोअर्सवर दरोडा घालून मोठ्या प्रमाणात दागिने लुटले होते. अटक करण्यात आलेल्यांची नावे शिवू ऊर्फ शिवमूर्ती (30), त्याचा भाऊ शंकर (26), निवेश कुमार (29) आणि जगदीश (30) अशी असून ते सांगली (महाराष्ट्र) भागातील आहेत.

या टोळीची दरोड्याची पद्धत खास होती. ज्वेलरी स्टोअरवर स्टोअर बंद होण्याच्या वेळी हल्ला करायचा, सुरक्षा रक्षकावर हल्ला करून स्टोअरवर पेट्रोल बॉम्बचा मारा करायचा आणि दागिन्यांची लूट करायची. अशाच प्रकारे या टोळीने या वर्षाच्या प्रारंभी शहरातील प्रसिद्ध अशा चेम्मनूर ज्वेलर्सवर हल्ला केला; पण तेथील तत्पर सुरक्षा रक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केल्याने दरोड्याचा प्रयत्न असफल ठरून त्यांना पळ काढावा लागला होता.

या टोळीने आतापर्यंत सुमारे 9 कोटी रुपयांचे दागिने लुटल्याचा पोलिसांचा कयास आहे; पण त्यांच्याकडून फक्‍त एक कोटी रुपयांचे दागिने दोन आलिशान मोटारी आणि अन्य मौल्यवान ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

बुलेटप्रूफ जाकिटे!

टोळीने दरोडखोरेतील जोखीम असल्याचे ओळखून बुलेटप्रूफ जाकिटे खरेदी केली असून उत्तर प्रदेशातून देशी हत्यारे खरेदी करण्याच्या तयारीत होते; परंतु ते हत्यारे खरेदी करू शकले नाहीत.

 

Tags : Bangalore, Bangalore crime, Robber gang, arrested,