Sat, Aug 24, 2019 11:08होमपेज › Belgaon › उजळला स्मार्ट सिटीचा कॉलेज रोड

उजळला स्मार्ट सिटीचा कॉलेज रोड

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 12 2018 11:06PMबेळगाव : प्रतिनिधी

मागील काही दिवसापासून अंधारात असणार्‍या कॉलेज रोडवर अख़ेर पथदीप लावण्यात आले. त्यामुळे रस्ता उजळून निघाला आहे. दै. पुढारीने कॉलेज रोडवरील बंद दिव्यांच्या समस्येवर 5 एप्रिलरोजी ‘स्मार्ट सिटीतील कॉलेज रोड अंधारात’ या मथळ्याखाली प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेवून मनपा अधिकार्‍यांनी दिव्यांची दुरुस्ती केली आहे. परंतु, अद्याप काही दिव्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे फूटपाथ अंधारात आहे. परिणामी ते दिवेही सुरू करावेत, अशी शहरवासीयांची मागणी आहे. 

कॉलेज रोड हा शहरातील मुख्य रस्ता.  हा मार्ग शहराबरोबर अनेक राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. यामुळे सातत्याने वर्दळ असते. रात्रीच्यावेळीदेखील वाहनांची सतत वाहतूक असते. मात्र दिवे नादुरुस्त झाल्यामुळे  रात्रीच्यावेळी पादचार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ती समस्या आता मिटली.

सध्या रस्त्यावरील दिवे दुरुस्त केले आहेत. मात्र फुटपाथवरील दिवे शोभेची वस्तू बनून राहिले आहेत. फुटपाथवर पादचार्‍यांच्या सोयीसाठी अनेक दिवे उभारण्यात आले आहेत.   परंतु, ते अद्याप बंद अवस्थेत आहेत. यामुळे हे दिवे केवळ शोभेची वस्तू बनून आहेत.मनपाने फुटपाथवरील दिवे त्वरित सुरू करावेत अशी मागणी करण्यात येत आहेत. या भागात अनेक महाविद्यालये, वसतीगृहे, दुकाने असल्यामुळे वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासोयीसाठी फुटपाथवरील दिव्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी फुटपाथवरील दिव्याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करूनदेखील दिवे दुरुस्त केलेले नाहीत.

Tags :   bright road , smart city's, College Road,belgaom news