Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Belgaon › वृद्धेचा महिलेकडून खून

वृद्धेचा महिलेकडून खून

Published On: Jan 28 2019 1:10AM | Last Updated: Jan 28 2019 12:24AM
बेळगाव : प्रतिनिधी

केके कोप (ता. बेळगाव) येथील बेपत्ता वृद्ध महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. तो खून एका महिलेनेच केल्याचा पोलिसांना संशय असून, त्या दिशेने त्यांनी तपास चालवला आहे. तायव्वा शिवाजी कदम (60, रा. केके कोप) असे मृत महिलेचे नाव आहे.

त्या 19 जानेवीरापासून बेपत्ता झाल्याची नोंद हिरेबागेवाडी पोलिसांत झाली होती. त्यांचा खून करून मृतदेह पोत्यात भरून तो कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथील वेदगंगा पात्रात टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. मालमत्तेच्या वादातून एका महिलेनेच हा खून केल्याचा संशय आहे.

तायव्वा भाजीपाला विकून गुजराण करीत होत्या. 19 रोजी त्या एका महिलेसह घरातून निघून गेल्या. त्यानंतर त्या न परतल्याने घरच्यांनी हिरेबागेवाडी पोलिसांत त्या बेपत्ता  असल्याची तक्रार दाखल नोंदवली.

चार दिवसांपूर्वी सापडला मृतदेह

24  जानेवारी रोजी मुरगूड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेदगंगा पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात भरल्याचे दिसत होते. शिवाय हे पोते दोन्ही बाजूंनी बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने येथे टाकल्याचे घटनास्थळावरून दिसत होते. त्यामुळे मुरगूड पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यांनी सीमेलगतच्या बेळगाव जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला. तेव्हा सापडलेला मृतदेह व केके कोपमधून बेपत्ता वृद्धेचे वर्णन जुळून आले. सदर वृद्धा ही बेपत्ता झालेली असल्याचे     पान 7 वर 

स्पष्ट झाल्यानंतर मुरगूड पोलिसांनी खून प्रकरणाची नोंद करून घेत ते बेळगाव पोलिसांकडे वर्ग केले आहे. 

‘त्या’ महिलेची चौकशी सुरू 

वृद्धेचा मृतदेह मिळाला असल्यामुळे बागेवाडीचे निरीक्षक नारायण स्वामी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ज्या महिलेने वृद्धेला सोबत नेले होते, तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, रविवारी तिची दिवसभर चौकशी सुरू होती. मालमत्तेच्या वादातूनच वृद्धेचा खून झाल्याचा संशय आहे. यामध्ये आणखी कोणी सामील आहे का?  या दिशेने तपास सुरू असल्याचे निरीक्षक नारायण स्वामी यांनी ‘पुढारी’ला सांगितले.