Mon, May 25, 2020 07:11होमपेज › Belgaon › सर्वात मोठा तिरंगा पुन्हा उतरवला

सर्वात मोठा तिरंगा पुन्हा उतरवला

Published On: May 27 2019 1:32AM | Last Updated: May 26 2019 8:13PM
बेळगाव : प्रतिनिधी

दीड वर्षांपासून सर्वात मोठ्या  तिरंगा ध्वजाचे ठिकाण म्हणून बेळगावची ओळख बनत आहे. पण, वादळी वार्‍यामुळे ध्वज सातत्याने उतरण्यात येत आहे. देशात सर्वात मोठ्या तिरंग्याचा मान मिळाला असला तरी पावसाळ्यात मात्र फडकत ठेवताना मोठी काळजी घ्यावी लागत आहे. वादळी वार्‍यामुळे किल्‍ला तलावाच्या काठावर उभारण्यात आलेला तिरंगा ध्वज पुन्हा उरवण्यात आला आहे.

बेळगावात सर्वात मोठा तिरंगा ध्वज उभारण्यात आला. 2018 साली फिरोज सेट आमदार असताना या ध्वजाचे अनावरण करण्यात आले होते. भारत?पाकिस्ताच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या ध्वजाची आणि बेळगावतील ध्वजाची उंची समान आहे. 360 फूट म्हणजेच 110 मीटर उंचीवर ध्वज उभारण्यात आला आहे. त्यावर 96000 चौरस फुटाचा ध्वज असून तो सातत्याने फडकत असतो.
सुमारे चार कोटी रूपये खर्च करून ध्वजाची उभारणी आणि परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. पण, गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यात ध्वज सातत्याने उतरवण्यात आला. वादळी वार्‍यामुळे दोन ते तीन वेळा ध्वजाचे नुकसान झाले. त्यामुळे ध्वजाचा आकार कमी करून फडकावण्यात आला. आता दोन दिवसांपूर्वी शहर परिसरात झालेल्या वादळी वार्‍यामुळे बुडा कार्यालयासमोरील हा ध्वज उतरवण्यात आला आहे. ध्वजाचे नुकसान होऊ नये, यासाठी बुडा कार्यालयाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

ध्वज असा
360
फूट (110) मीटर उंची
96000
चौ. फूट. ध्वजाचा आकार
1.57 कोटी
उभारणीसाठी खर्च
2.5 कोटी सौंदर्यीकरणासाठी खर्च