Tue, Dec 10, 2019 13:43होमपेज › Belgaon › कर्नाटक राज्यपालपदी स्वराज की महाजन?

कर्नाटक राज्यपालपदी स्वराज की महाजन?

Published On: Jun 04 2019 1:29AM | Last Updated: Jun 04 2019 12:29AM
बंगळूर : प्रतिनिधी

केंद्रामध्ये नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्व राज्यांचे राज्यपाल बदलण्याची अलिखित प्रथा आहे. कर्नाटकाचे राज्यपाल वजुभाई वाला यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपणार असून त्यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज किंवा माजी सभापती सुमित्रा महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

केंद्रामध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार अस्तित्वात आले आहे. मंत्रिमंडळ शपथबद्ध झाले असून कामास प्रारंभ झाला आहे. आता प्रत्येक राज्याच्या राज्यपालांच्या बदल्यांचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मागील कार्यकाळात विदेश व्यवहार मंत्री असणार्‍या सुषमा स्वराज यांना यंदाच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. याबाबत त्यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया देताना यावेळी आपण सरकारचा भाग असणार नसल्याचे संकेत दिले. त्यानुसार त्यांना राज्यपालपद देण्यात येण्याची शक्यता आहे.

स्वराज यांना कर्नाटकाबाबतची माहिती आहे. येथून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण, बळ्ळारीतील खाणसम्राट रेड्डी बंधूंशी त्यांचा परिचय असल्याने त्यांना डावलण्यात येऊ शकते. त्याऐवजी अजातशत्रू म्हणून ओळखल्या जाणार्‍या माजी सभापती सुमित्रा महाजन यांची राज्यपालपदी नेमणूक होऊ शकते.