Sun, Dec 15, 2019 03:14होमपेज › Belgaon › विद्यार्थी अजूनही बूट, सॉक्सपासून वंचित

विद्यार्थी अजूनही बूट, सॉक्सपासून वंचित

Published On: Jun 27 2019 1:31AM | Last Updated: Jun 26 2019 11:54PM
बेळगाव : प्रतिनिधी

शैक्षणिक वर्षारंभ होऊन महिना उलटत आला तरी गणवेश, बूट, सॉक्स, सायकली वितरण करण्यात विलंब झाला आहे. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात केवळ गणवेश वितरण झाले आहे.

राज्यात 95 टक्के शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे शाळा सुधारणा समित्यांना (एसडीएमसी) बूट, सॉक्स खरेदीसाठी निधी मंजूर केलेला नाही. जूनअखेरपर्यंत बूट आणि सॉक्स वितरण करावे. कोणत्याही कारणास्तव 15 जुलैची मुदत ओलांडू नये, असे शिक्षण खात्याने 6 मे रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. आता जून संपत आला तरी निधी मिळाला नसल्याने 15 जुलैनंतरही बूट, सॉक्स वितरण प्रक्रिया सुरु राहण्याची शक्यता आहे. 

एसडीएमसीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतील. मुख्याध्यापक सदस्य सचिव असतील. शिवाय एसडीएमसीतील आणखी तिघे सदस्य या समितीत असणार आहेत. समितीमध्ये दोन महिला असणे सक्‍तीचे आहे. वाणिज्य कर खात्यामध्ये नोंदणी असणार्‍या, उत्पादनाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणार्‍या कंपनीकडूनच उत्कृष्ट दर्जाचे बूट, सॉक्स खरेदी करण्याची सक्‍ती सरकारने केली आहे.

यंदा याबाबत कठोर सूचना देण्यात आली आहे. बाटा, लिबर्टी, लॅन्सर, पॅरागॉन, अ‍ॅक्शन, लखानी आदी कंपन्यांकडून बूट, सॉक्स खरेदी करावी. बोगस कंपनीकडून खरेदी आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक, गटशिक्षिणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा शिक्षण खात्याने दिला आहे.

बेळगाव, चिकोडीत गणवेश वितरण झाले आहे. पण, बूट आणि सॉक्स नाही. विजापुरात पाठ्यपुस्तके, सायकली मिळाल्या नाहीत. शिमोगा, चिक्‍कमगळूर, मंगळूर, उडपी, कोलार, म्हैसूर, मंड्या, हासन, चामराजनगर, बालकोट येथे गणवेश आणि बूट दोन्हीही नाहीत.