Sat, Dec 14, 2019 05:40होमपेज › Belgaon › सहा गांजाविक्रेत्यांना अटक

सहा गांजाविक्रेत्यांना अटक

Published On: Jul 20 2019 12:46AM | Last Updated: Jul 20 2019 12:30AM
बेळगाव : प्रतिनिधी  

शहरात दोन ठिकाणी सीईएन व सीसीआयबी पोलिसांनी छापे टाकून गांजा विक्री करणार्‍या सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून 38 हजार 930 रुपये किमतीचा 2 किलो 84 ग्रॅम गांजा जप्‍त करण्यात आला आहे. ही कारवाई धर्मनाथ भवन व किल्ला भाजी मार्केट येथे करण्यात आली आहे.  तीन दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे. बुधवारी आठ जणांना गांजाविक्रीबद्दल पोलिसांनी अटक केली होती.

मोदिन रिफक अत्तार (वय 34, रा. सुभाषनगर), तबरेज इब्राहिम अंडेवाले (वय 20, रा. वीरभद्रनगर), चेतन मारुती शिंदे (वय 19, रा. कुरबर गल्ली, अनगोळ), महम्मद यासिन कुतबुद्दीन अत्तार (वय 23, रा. सुभाषनगर), महम्मदशाहीद आतिक मुल्ला (वय 19, रा. वीरभद्रनगर) यांना धर्मनाथ भवन सर्कल येथे गांजा विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून 1 किलो 486.5 ग्रॅम गांजा व 5 मोबाईल असा 32 हजार 950 रु.चा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. 

दुसर्‍या घटनेत किल्ला भाजी मार्केट येथे गांजा विक्री करताना एकाला अटक करण्यात आली आहे. अन्वर हुसेन तखीजवाद (वय 57 रा.घी गल्ली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 5,980 किंमतीचा 598 ग्रॅम गांजा जप्‍त करण्यात आला आहे. सीईएन पोलिस निरीक्षक यू. एच. सातेनहळ्ळी, सीसीआयबी पोलिस स्थानकाच्या अधिकार्‍यांनी सदर कारवाई करून गांजा विक्री करणार्‍यांना अटक केली आहे.