Tue, Aug 20, 2019 08:29होमपेज › Belgaon › उमेदवार यादीतून चिन्हे गायब

उमेदवार यादीतून चिन्हे गायब

Published On: Apr 24 2019 1:36AM | Last Updated: Apr 24 2019 1:36AM
बेळगाव : प्रतिनिधी

मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या यादीतून उमेदवारांची चिन्हे गायब झाली होती. प्रशासनाने कन्‍नड व मराठीतून यादी लावली होती. यामध्ये नावे, पत्ता व चिन्ह अक्षरी लिहिले होते. याचा मनस्ताप अशिक्षित मतदारांना सहन करावा लागला.

मतदारांना उमेदवारांची नावे आणि चिन्हे समजावीत, यासाठी याद्या मतदान केंद्राबाहेर लावण्यात आल्या होत्या. परंतु, यातून चिन्हे गायब झाली होती. उमेदवारांची चिन्हे अक्षरी लिहिली होती. वास्तविक अक्षरी चिन्हासोबत चित्रासहाय्याने चिन्हे असणे आवश्यक असते.