Mon, Aug 19, 2019 02:44होमपेज › Belgaon › परमेश्‍वरांचा विजय म्हणजे राहुल गांधीचा विजय

परमेश्‍वरांचा विजय म्हणजे राहुल गांधीचा विजय

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 11:48PMतुमकूर : प्रतिनिधी

कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. परमेश्वर यांचा विजय म्हणजे अ. भा. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा विजय आहे. राहुल गांधी यांचा विजय म्हणजे आपला विजय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

डॉ. परमेश्‍वर यांच्या तुमकूर जिल्ह्यातील कोरटगेरे मतदारसंघात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री बनल्यानंतर सिद्धरामय्यांची ही या मतदारसंघातील पहिलीच सभा. ते म्हणाले, आपल्यात व प्रदेशाध्यक्ष परमेश्वर यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. आम्ही दोघे भाऊ आहोत. सूर्योदय जसा पूर्व दिशेला होतो हे  सांगण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ. परमेश्‍वर यांचा विजयदेखील निश्‍चित आहे असा आत्मविश्‍वास आहे.

निजद अध्यक्ष कुमारस्वामी यांच्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, त्यांचे वडील मुख्यमंत्री झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी केवळ ग्रामवास्तव्य हा एकमेव कार्यक्रम राबविला. अंथरून, कमोडसह एखादे गाव रात्री दोन वाजता गाठणे आणि सकाळी 6 वा. गावातून पळ काढणे असा प्रकार त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात, रिकामी बात आहे.  त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान आपण पाहिला नाही, अशी टीकाही सिद्धरामय्यांनी केली.

भाजपकडून बंगळूर बचाव आंदोलन सुरू आहे. त्यावर टीका करताने मुख्यमंत्री म्हणाले,  बंगळूरची वाट लावण्याचे काम भाजपने केले आहे. त्यांच्याकडून बंगळूर बचावचा सुरू असलेला प्रकार हास्यास्पद आहे.  यासाठी राज्यातील जनतेने भाजपपासून चार हात दूर रहावे.

डॉ. परमेश्वर म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सभेला हजेरी लावून मार्गदर्शन केल्यामुळे आपल्याला हत्तीचे बळ आले आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी गरिबी हटावोचा नारा दिला होता. सिद्धरामय्या यांनी अन्नभाग्य योजना राबवून गरिबाना न्याय दिला आहे.