Tue, Aug 20, 2019 09:26होमपेज › Belgaon › बोरगाव नगराध्यक्षपदी गोरवाडे बिनविरोध

बोरगाव नगराध्यक्षपदी गोरवाडे बिनविरोध

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 19 2018 8:58PMबोरगाव : वार्ताहर

ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास पॅनलच्या अडीच वर्षात दुसर्‍या टप्प्याच्या नगराध्यक्षा म्हणून शोभा शीतल गोरवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी द्वितीय श्रेणी तहसीलदार संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायत कार्यालयात ही निवड झाली. मे 2016 मध्ये झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत नगरविकास पॅनेलने एकहाती सत्ता मिळविली आहे. यापूर्वी सुजाता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली. गोरवाडे यांचा एकमेव अर्ज आला होता. नगरसेवक जिवंधर पाटील  सूचक होते. बोरगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न राहतील, असे मनोगत गोरवाडे यांनी व्यक्त केले.

रावसाहेब पाटील, डॉ. शंकर माळी, उपतहसीलदार पी. बी. शिलवंत, मुख्याधिकारी गुरुबसव डंबळ, तलाठी उमेश कोळी, बाळासाहेब भोसले, जे. जे. मालगावे, बी. जे. पाटील, मारुती निकम, अभय मगदूम, राजू मगदूम, अशोक माळी, सुरेखा घाळे, मायाप्पा कांबळे, शोभा हवले, बी. टी. वठारे आदी उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.