Tue, Dec 10, 2019 14:11होमपेज › Belgaon › राज्यात शिवसेना ५० जागा लढविणार  

राज्यात शिवसेना ५० जागा लढविणार  

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 8:45PMजमखंडी : प्रतिनिधी

राज्यात येत्या काही महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. 50 मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी माहिती श्रीराम सेना राज्य अध्यक्ष शिवसेना राज्य संचालक प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चिक्कमंगळूर जिल्ह्यातील श्रृंगेरी  किंवा बागलकोट जिल्ह्याच्या तेरदाळ येथून आपण निवडणूक लढविणार आहोत. आपण कोणाच्या दबावाला बळी पडून निवडणूक रिंगणातून माघार घेणार नाही किंवा सत्तेसाठी निवडणूक लढविणार नाही तर शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी निवडणूक लढविणाचा आपला प्रयत्न असल्याचे मुतालिक म्हणाले.

राज्यातील समस्या सोडवून घेण्यासाठी जनतेच्या पाठिशी शिवसेना राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूंना मातेसमान असून आम्ही सर्वजण त्या मातेची लेकरे  आहोत. हिंदुत्वाला धक्का पोचविण्याचे प्रयत्न झाल्यास आम्ही कदापि खपवून घेणार नाही. त्या विरोधात आवाज उठवू, असेही मुतालिक म्हणाले.

आ.हॅरिसच्या मुलावर कारवाई व्हावी  

बंगळुरच्या शांतीनगराचे आमदार हॅरिस यांच्या मुलाने रविवारी बंगळूर महानगरात केलेली गुंडगिरी ही असह्य बाब आहे. आ.हॅरिस हे मूळचे केरळमधील मणिपूरमचे असून येथे नेहमी गुंडगिरी घडत असते. तसा प्रकार बंगळुरात झाला आहे. हॅरिस यांच्या मुलाची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा  श्रीराम सेना राज्यभरात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही मुतालिक यानी दिला.