Thu, Dec 12, 2019 22:14होमपेज › Belgaon › बेळगाव ग्रामीण एसीपीपदी शिवारेड्डी

बेळगाव ग्रामीण एसीपीपदी शिवारेड्डी

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 13 2019 12:31AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव ग्रामीण विभागाचे एसीपी म्हणून शिवारेड्डी के. यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उत्तर विभाग रहदारी पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांची कित्तूर विभागात बदली करण्यात आली आहे. यासह राज्यातील 21 डीएसपींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

पोलिस खात्यामध्ये अधिकार्‍यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच असून जिल्हा उपअधीक्षकांच्या बदल्यांचा आदेश  पोलिस महासंचालक निलमणी राजू यांनी जारी केला आहे. हुबळी हेस्कॉम येथील नागप्पा अंबीगेर यांची हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात बदली करण्यात आली आहे. हुबळी-धारवाड कमरीपेठ  पोलिस स्थानकातून नंदेश्‍वर कुंभार यांची बेळगाव रहदारी उत्तर विभागात बदली करण्यात आली आहे.  राज्य गुप्तचर विभागातील शंकरानंद मदीहळ्ळी यांची पीटीएस खानापूर येथे बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात महासंचालकांनी आदेश जारी केला आहे.