Mon, Jul 13, 2020 08:14होमपेज › Belgaon › ऑनलाईन खरेदी करताय, सावधान!

ऑनलाईन खरेदी करताय, सावधान!

Published On: Jan 23 2019 1:03AM | Last Updated: Jan 23 2019 1:03AM
बेळगाव : प्रतिनिधी 

सणासुदीचे दिवस आले, घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असला किंवा लग्नसराई सुरू झाली की ऑनलाईन खरेदीची धामधूम सुरु होते. मात्र, ऑनलाईन खरेदी करताना आपली फसवणूक होऊ शकते याचा विचार करून खरेदी करणे गरजेचे आहे. चार दिवसांपूर्वी बसवन कुडची येथील तरुणाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची झटना घडली आहे. यामुळे ऑनलाईन शॉपिंग करायची की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

बसवन कुडची येथील एका युवकाला नवी दिल्ली येथून फोन आला. की, तुम्हाला 18 हजारांचा मोबाईल फक्त 4 हजार रुपयांना मिळणार आहे. यानंतर युवकांने तातडीने ऑर्डर केली. पोस्टाच्या सहाय्याने त्याने पैसे भरले. मात्र, त्या ऑर्डर बॉक्समध्ये बेंटेक्सचे देवाचे दागिने आले. यामुळे ऑनलाईन शॉपिंग बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधीत फोनवर त्या युवकाने फोन केला असता त्यावरील फोन क्रमांक नॉट रिचेबल येत होता. 

ऑनलाईन खरेदी करताना अधिकृत वेबसाईटची पडताळणी न केल्यामुळे फसवणुकीची शक्यता असते. मागील वर्षभरात या स्वरुपाच्या असंख्य तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. ऑनलाईन खरेदी करताना ज्या वेबसाइट्सच्या मार्फत आपण खरेदी करणार असू ती वेबसाईट, वस्तूंची उपलब्धता आणि दर्जा या बाबतीत कशी आहे ते पाहून घ्यावे. बेळगाव शहरात अशा ऑनलाईन फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, काही क्‍वचितच लोक पोलिसांत तक्रार दाखल करतात. यामुळे त्यांचेही फावते. तुमची फसवणूक झाल्यास तक्रार करणे गरजेचे असते.