Sun, Dec 08, 2019 21:47होमपेज › Belgaon › पंतप्रधान मोदी उद्या, राहुल शुक्रवारी चिकोडीत

पंतप्रधान मोदी उद्या, राहुल शुक्रवारी चिकोडीत

Published On: Apr 17 2019 2:03AM | Last Updated: Apr 16 2019 11:11PM
बेळगाव : प्रतिनिधी

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (18), तर काँग्रेसच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी (19 एप्रिल) चिकोडीत सभा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 18 रोजी दुपारी चिकोडी येथे बी. के. महाविद्यालयाच्या समोरील बाजूस असलेल्या पटांगणावर होत आहे. त्यांच्या सभेला शह देण्यासाठी त्याच्या दुसर्‍याच दिवशी राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या दौर्‍याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला आहे. 

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वधेरा यांच्या सभेसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्रयत्न सुरु होते. 19 एप्रिलरोजी यांची राहुल यांची सभा आर. डी. कॉलेजच्या मैदानावर दुपारी 12 वाजता होणार आहे. 

आता होणार तुलना

पंतप्रधान मोदी आणि गांधी यांच्या सभा चिकोडी शहरात होत असल्यामुळे त्यांच्या सभेसाठी होणार्‍या गर्दीची दोन्ही पक्षाकडून तुलना होण्याची शक्यता आहे.