Mon, Sep 16, 2019 05:44होमपेज › Belgaon › हेल्मेट न घातल्याने पाऊण लाखाचा दंड 

हेल्मेट न घातल्याने पाऊण लाखाचा दंड 

Published On: May 15 2019 1:50AM | Last Updated: May 15 2019 12:14AM
बेळगाव : प्रतिनिधी

वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणार्‍या दुचाकी चालकांवरील कारवाई पुन्हा तीव्र केली आहे. सोमवारपासून या कारवाईला जोर आला आहे.  मंगळवारी एकाच दिवशी 723 जणांवर कारवाई करत 72 हजार 300 रूपयांचा दंड वसूल केला. 

पोलिस आयुक्तालयाने दोन दिवसांपूर्वी पत्रक प्रसिद्धीला देत पुन्हा हेल्मेटसक्ती तीव्र करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार 13 मे पासून कारवाई तीव्र झाली आहे. या दिवशी 600 हून अधिक जणांवर कारवाई केली होती, तर दुसर्‍या दिवशी ही संख्या वाढून 723 जणांवर कारवाई केली. ही कारवाई शहरात ठिकठिकाणी थांबलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. याशिवाय वाहतूक व्यवस्थापन केंद्रातून (टीएमसी) कारवाई सुरूच आहे. 

रिक्षांसोबत हेल्मेटही 
रिक्षा चालकांविरोधात तक्रारी वाढल्याने पंधरवड्यापासून शहरात बेकायदेशीररित्या फिरणार्‍या रिक्षा पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. आरटीओ व वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून परमीट नसलेल्या तसेच मीटरनुसार भाडे न आकारणार्‍या 200 हून अधिक रिक्षांवर कारवाई केली. आता पुन्हा एकदा हेल्मेटसंबंधी कारवाई सुरू आहे.