Mon, Dec 09, 2019 10:59होमपेज › Belgaon › ‘आमचा गाव-आमचा रस्ता’ कागदावरच 

‘आमचा गाव-आमचा रस्ता’ कागदावरच 

Published On: Jun 24 2019 1:29AM | Last Updated: Jun 23 2019 8:44PM
बेळगाव ः प्रतिनिधी  

राज्य सरकारने ग्रामीण भागााच्या संर्पेर्ण विकासाला चालकना देण्यासाठी महत्वाकांक्षी 14 कलमी योजना जारी केली आहे. त्यामध्ये शेतवडीतील रस्त्यांसाठी असणारी आमचा गाव- आमचा रस्ता योजना शेतकर्‍यांच्या असहकार्य भूमिकेमुळे रखडली आहे. बहुतांश गावांमध्ये शेतकर्‍यांमधील एकीअभावी योजना कागदावरच राहिली आहे. 

माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या कार्यकाळात माजी ग्रामीण विकास मंत्री यांनी ग्रामीण भागाचा संपूर्ण विकास समोर ठेवून 14 कलमी महत्वाकांक्षी योेेजना सुरू केली. शेतकर्‍यांना शेतवडीत ये-जा करण्यासाठी शेतवडीतील रस्ते होणे आवश्यक आहे. शेतातील रस्त्यांशिवाय शेतकर्‍यांचे होणारे हाल थांबणे अशक्य आहे. विशेष करुन पावसाळ्यात हाल सहन करुन चिखलातून मार्ग काढत शेतवडीत जावे लागते. तर पिकविलेला शेतीमाल बाजार पेठेत नेताना रस्त्यांंअभावी शेतकर्‍यांची मोठी समस्या होत आहे. 

मात्र अनेक ग्राम पंचायतींकडून ही योेजना राबविण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. ग्राम पंचायत सदस्यांकडून अशा योेजना राबविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. योेजनांबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यात आलेली नाही. 

कांही ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेऊन योजना यशस्वी केली. शेतवडीतील रस्ते निर्माण करुन शेतकर्‍यांना रस्त्यांची सोय करुन दिली आहे. त्यामुळे मोजक्याच ग्राम पंचयतींकडून सरकारी योजनेचा लाभ घेण्यात आला आहे.  अनेक ठिकाणी आमचा गाव आमचा रस्ता योजनेचे महत्व शेतकर्‍यांना पटवून देण्यात आले आहे. मात्र मोजक्याच शेतकर्‍यांच्या ताठर भूमिकेमुळे अनेक शेतकर्‍यांना याचा फटका बसत आहे. हे चित्र बहुतांश गावांमध्ये आहे. 

आमचा रस्ता चिखलाचाच

रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम हाती घेऊन ग्रामस्थांना रोेजगार व शेतीला रस्ता असा आराखडा तयार करण्यात आला आाहे. मात्र शेतकर्‍यांकडूनच रस्त्यांसाठी जागा देण्यास नकार दर्शविण्यात येत असल्याने योजनेचा लाभ ग्राम पंचायतीला करुन देणे अशक्य ठरले आहे. शेतकरीच रस्ता कामात अडथळा आणत  असल्याने आमचा गाव- आमचा रस्ता चिखलाचाच असे म्हणण्याची वेळ आली आहे.