Mon, Jan 20, 2020 10:28होमपेज › Belgaon › आलमट्टी धरण भरण्याच्या मार्गावर

आलमट्टी धरण भरण्याच्या मार्गावर

Published On: Jul 20 2019 12:46AM | Last Updated: Jul 19 2019 11:59PM
बेळगाव : प्रतिनिधी

उत्तर कर्नाटकाला पाणी पुरवणारे  आलमट्टी धरण भरण्यास केवळ 1 मीटर बाकी राहिले आहे. गुरूवारी धरणातील पाण्याची पातळी 518.55 मीटर होती. धरणाची कमाल पातळी 519.60 मीटर इतकी आहे. सध्या धरणात 106 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची क्षमता 123.081 टीएमसी आहे.

मागील वर्षी याच दिवशी पाण्याची पातळी 518.75 मीटर इतकी होती आणि पाण्याचा साठा 109 टीएमसी होता. धरणामध्ये 46,239 क्युसेक पाणी येत आहे. त्याचबरोबर 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयना परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. तसेच उत्तर कर्नाटकातील अंतर्गत भागातही जोरदार पाऊस होत आहे. धारवाड परिसरात गुरूवारी दुपारी 2 तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानेही धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.