Mon, Dec 09, 2019 10:59होमपेज › Belgaon › बेळगावात ‘नो पार्किंग झोन’ जाहीर

बेळगावात ‘नो पार्किंग झोन’ जाहीर

Published On: Jul 07 2019 1:29AM | Last Updated: Jul 06 2019 11:44PM
बेळगाव : प्रतिनिधी

सुरळीत वाहतुकीसाठी पोलिस आयुक्‍तालयाने शहरातील विविध रस्त्यांवर पार्किंगवर बंदी घातली आहे. त्यामुळे या रस्त्यांवर वाहने थांबवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्‍तांनी दिलेल्या पत्रकानुसार चन्‍नम्मा चौकापासून कोल्हापूरपर्यंत, कोल्हापूर सर्कलपासून केएलई रुग्णालयापर्यंत, कोल्हापूर सर्कलपासून संगोळ्ळी रायण्णा चौकापर्यंत, संगोळ्ळी रायण्णा चौकापासून अशोक चौकापर्यंत, अशोक चौकापासून कनकदास चौकापर्यंत, अशोक चौकापासून न्यू गांधीनगरपर्यंत, सर्किट हाऊसपासून मुजावर खुटपर्यंत, मध्यवर्ती बसस्थानकापासून पोलिस भवनापर्यंत, चन्‍नम्मा चौकापासून पवन हॉटेलपर्यंत, रामदेव हॉटेलपासून धर्मनाथ भवनपर्यंत, यंदे खूटपासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत, मीलन हॉटेलपासून हर्षा इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, गोंधळी गल्‍ली क्रॉसपासून आयडीबीआय बँकेपर्यंत, बँक ऑफ इंडियापासून शिवाजी उद्यानापर्यंत, आरपीडी चौकापासून भाग्यनगर क्रॉसपर्यंत पार्किंग बंदी असणार आहे.

या ठिकाणी फक्‍त दुचाकी

समादेवी गल्‍लीतील मंदिरापासून नार्वेकर गल्‍ली, रिसालदार गल्‍ली, शनिवार खूट या मार्गावर केवळ दुचाकी वाहनांना प्रवेश असणार आहे. इतर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.