Tue, Aug 20, 2019 08:33होमपेज › Belgaon › निजद प्रदेशाध्यपदी एच. के. कुमारस्वामी

निजद प्रदेशाध्यपदी एच. के. कुमारस्वामी

Published On: Jul 05 2019 1:30AM | Last Updated: Jul 05 2019 12:00AM
बंगळूर : प्रतिनिधी

निजद प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री एच. के. कुमारस्वामी तसेच कार्याध्यक्षपदी एस. मधू बंगारप्पा यांची निवड झाली. त्यांच्यासह तीन उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापुरातील नेते नासीर बागवान यांची राज्य अल्पसंख्याक शाखेच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

गुरुवारी (दि. 4) याबाबतचा आदेश निजद कार्यालयाने जारी केला. एन. एम. नबी, के. गोपालय्या यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी, आर. मंजुनाथ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. युवा निजद प्रदेशाध्यक्षपदी निखिल कुमारस्वामी, एन. एम. नूरअहमद कार्याध्यक्ष, शरणगौडा कंदकूर महासचिव, नरसिंहमूर्ती वरिष्ठ उपाध्यक्ष, सी. बी. सुरेशबाबू यांची बूथ समिती अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.