Sat, Sep 21, 2019 07:03होमपेज › Belgaon › निकालाआधीच निखिल कुमारस्वामी खासदार

निकालाआधीच निखिल कुमारस्वामी खासदार

Published On: May 23 2019 1:40AM | Last Updated: May 22 2019 11:45PM
बंगळूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच एका निजद नेत्याने आपल्या मुलाच्या लग्‍नपत्रिकेवर निखिल कुमार यांना खासदारपद देऊ केले आहे. या लग्‍नपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून निकालाच्या आतुरतेबाबत चर्चा सुरु आहे.

मंड्या मतदारसंघाची लढत हाय व्होल्टेज ठरली. मुख्यमंत्रिपुत्र निखिल कुमारस्वामी निजदमधून आणि दिवंगत अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री अंबरीश यांच्या पत्नी अपक्ष म्हणून रिंगणात 
होत्या. 

मतदान चुरशीने झाले असून निकालाबाबत उत्सुकता आहे. असे असतानाही एका निजद नेत्याने आपल्या मुलाच्या लग्‍नपत्रिकेवर  विशेष निमंत्रित म्हणून निखिल कुमारस्वामी यांचा फोटो छापला आहे. निखिल यांच्या नावाआधी खासदार असे मुद्रित करण्यात आले आहे.

दरम्यान, गुप्‍तचरांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात तसेच एक्झिट पोलमध्येही मंड्याबाबत स्पष्ट निकालाचा अंदाज व्यक्‍त केलेला नाही.