Sun, Dec 15, 2019 03:13



होमपेज › Belgaon › बेळगाव मार्केटमध्ये नव्या बनावट नोटा?

बेळगाव मार्केटमध्ये नव्या बनावट नोटा?

Published On: Dec 26 2018 1:14AM | Last Updated: Dec 26 2018 1:14AM




बेळगाव : प्रतिनिधी 

हे टोळके गेल्या सहा महिन्यांपासून बनावट नोटा बनवत आहे. बेळगावातील बाजारपेठेत 2000 हजार व 500 मूल्याच्या बनावट नोटा अधिक प्रमाणत असल्या तरी त्यांनी 100, 50, 20 रुपयांच्या बनावट नोटादेखील बनविल्या आहेत. परंतु, त्याचे प्रमाण कमी आहे. परंतु, या बनावट नोटा मार्केटमध्ये फिरत असल्याचा संशयही आहे. 

चर्चेतील सामाजिक कार्यकर्ता

या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून अटक केलेला रफिक देसाई हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. सिव्हीलमध्ये रूग्णांसाठी अन्नदानामुळे तो चर्चेत होता. शिवाय निवडणूक काळात त्याला चन्नम्मा सर्कलमध्ये अर्धनग्न करून मारहाण व अन्य कारणांमुळे देखील तो अनेकदा चर्चेत आला होता. बनावट नोटा प्रकरणात तो अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

बडे मासेही सहभागाचा संशय 

बनावट नोटांमध्ये हे दोघे सापडले असले तरी त्यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. काही बडे मासेही यामध्ये सहभागी आहेत. परंतु, त्यांची नावे अद्याप पुढे आलेली नाहीत. कोटीच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात फिरविणे हे दोघांचेच काम नसून, यासाठी आणखी काही जणांचा आशिर्वाद असण्याची शक्यता असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.