Tue, Jul 07, 2020 19:56होमपेज › Belgaon › मनपा निवडणूक ऑगस्टमध्ये?

मनपा निवडणूक ऑगस्टमध्ये?

Published On: May 23 2019 1:40AM | Last Updated: May 23 2019 1:40AM
बेळगाव : प्रतिनिधी

वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणावरून वादाच्या भोवर्‍यात अडकलेली महापालिका निवडणूक ऑगस्टमध्ये होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मार्चपासून मनपावर प्रशासकीय राजवट लागू झाली असून सहा महिन्यांच्या आत निवडणुका होणे गरजेचे आहे. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या महिन्यात बंगळूरहून व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन निवडणुकीसाठी सज्ज राहा, असा आदेश देण्यात आला आहे.

न्यायालयाच्या कामकाजाला 28 तारखेनंतर सुरुवात होणार असून त्यानंतर दाखल केलेल्या याचिकेवर जूनच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये  निवडणुका जाहीर होण्याचे संकेत महापालिकेला मिळाले आहेत. 28 फेब्रुवारीला महापौरांचा, तर 9 मार्चला नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला. 12 मार्चनंतर महापालिकेवर प्रशासकीय लागू करण्यात आली आहे. 

वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाविरोधात आजी-माजी नगरसेवकांसह दहा जणांनी धारवाड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आतापर्यंत सात वेळा सुनावणी झाली आहे.  

निवडणुकीसाठी महापालिकेने  कंबर कसली असून वॉर्ड पुनर्रचना केल्याप्रमाणे मतदानाच्या याद्या तयार केल्या आहेत. केंद्राची संख्यादेखील निश्‍चित झाली आहे.  मतदार व माजी नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे मतदार याद्या कन्‍नडबरोबर मराठीतदेखील तयार झाल्या आहेत.