Sun, Dec 15, 2019 03:15होमपेज › Belgaon › मंत्री अंगडींचे फॉलोअर्स वाढले

मंत्री अंगडींचे फॉलोअर्स वाढले

Published On: Jun 03 2019 1:42AM | Last Updated: Jun 03 2019 1:42AM
बेळगाव : प्रतिनिधी

सुरेश अंगडी यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून विजयी चौकार मारत केंद्रीय राज्य मंत्रीपदही पटकावले. त्यांच्या या कामगिरीमुळे ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येत अडीच पट वाढ झाली आहे. मंत्रिपदामुळे राज्यात वजन वाढलेल्या अंगडींचा आता समाजमाध्यमांत बोलबाला निर्माण होत आहे.

सुरेश अंगडी यांनी सलग तीनवेळा विजय मिळवला तरी, मतदारसंघात त्यांचा वावर कमी होता. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा अंगडी यांना फायदा झाला. पक्षातील विरोधकांवर आणि निवडणुकीच्या मैदानातील विरोधकांवर एकतर्फी मात करत त्यांनी दणदणीत विजय संपादित केला.

खासदार असताना अंगडी यांना ट्विटरवर 600 फॉलोअर्स होते. आता केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळताच यामध्ये  अडीचपट वाढ असून 1460 फॉलोअर्स झाले आहेत.सद्यस्थितीत राजकारणात समाजमाध्यमांचे काम महत्त्वाचे ठरले आहे. जवळपास सर्वच वरिष्ठ नेते ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. त्यामुळे सर्व राजकारण्यांनी समाजमाध्यमांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. काही वेळा तर 1 लाख लाईक आले तरच, आमदारकीचे तिकीट मिळेल, अशी अटकळ कर्नाटक विधानसभेवेळी घातली होती. त्यामुळे समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर होते. अंगडी फेसबुकवर सक्रिय होते. आता ट्विटरवर त्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधता येणार आहे.