Tue, Aug 20, 2019 08:16होमपेज › Belgaon › संमेलनाध्यक्षपदी  प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे;  चार  सत्रांत होणार

बेडकिहाळ येथे 30 रोजी मराठी साहित्य संमेलन

Published On: Jun 27 2019 1:31AM | Last Updated: Jun 26 2019 11:57PM
बेडकिहाळ : वार्ताहर

येथील साहित्य अ‍ॅकॅडमीतर्फे 30 रोजी दुसरे मराठी साहित्य संमेलन होत आहे. बी. एस. संयुक्‍त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या रत्नाप्पाणा कुंभार सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या   संमेलनाध्यक्षपदी हे मराठी साहित्य संमेलन भरत आहे.

एकूण 4 सत्रात संमेलन होत आहे. स्वागताध्यक्ष म्हणून अ‍ॅड. पी. आर. पाटील आहेत. ग्रा. पं. अध्यक्षा शारदा जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी, पहिल्या सत्रात उद्घाटन, दुसर्‍या सत्रात प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. त्यामध्ये प्रा. प्रदीप पाटील, प्रा. संजय ठिगळे हे शिक्षण, साहित्य व समाज या विषयावर मते मांडणार आहेत.

दुपारी तिसर्‍या सत्रात आधुनिक शेती विषयावर तात्यासाहेब मलगौडन्‍नावर मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी कृषी पंडित सुरेश देसाई उपस्थित राहणार आहेत. चौथ्या सत्रात जेष्ठ कथाकथनकार प्रा. आप्पासाहेब खोत यांचा कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे.

संमेलनास खा. अण्णासाहेब जोल्‍ले, आ. शशिकला जोल्‍ले, आ. गणेश हुक्केरी, उद्योजक प्रशांत पाटील, स्वरुप महाडिक, जि. पं. सदस्य सूदर्शन खोत, राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगळे यांच्यासह ता. पं., ग्रा. पं. सदस्य उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रा. वि. गो. वडेयर, उपाध्यक्ष डॉ. गोपाळ महामुनी, सचिव सागर केसरकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.