Thu, Dec 12, 2019 22:33होमपेज › Belgaon › खा. सुरेश अंगडी-खा. प्रभाकर कोरे यांच्यामध्ये कलगीतुरा

खा. सुरेश अंगडी-खा. प्रभाकर कोरे यांच्यामध्ये कलगीतुरा

Published On: Dec 26 2018 1:14AM | Last Updated: Dec 26 2018 1:14AM
बेळगाव : प्रतिनिधी

गोगटे सर्कल जवळील रेल्वे उड्डाण पुलाच्या उद्घाटन समारंभावेळी खा. सुरेश अंगडी व खा. प्रभाकर कोरे यांच्यामध्ये उपस्थितांसमोरच कलगीतुरा रंगला. 

आधीच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार कोरे यांचे नाव नसल्यामुळे ते नाराज होते व ते व्यासपीठावर जात नव्हते. त्यावेळी खा. सुरेश अंगडी यांनी खा. कोरे यांना ‘तुम्ही व्यासपीठावर येणार की नाही. मी तुम्हाला व्यासपीठावर येण्याची विनंती करत करतो, घाईत नाव राहिले असेल, इतके ज्येष्ठ नेते आहात तुम्हाला कॉमन सेन्स हवा, असे सांगत खा. अंगडी यांनी खा. कोरे यांना व्यासपीठावर घेतले. पुलाच्या उद्घाटनाची तातडीने दुसरी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली. त्यामध्ये खा. प्रभाकर कोरे यांच्या नावाचा उल्‍लेख आहे. पहिल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे नाव होते. परंतु अचानकपणे त्यांना मंत्रिमंडळातून वगळले. त्यामुळे त्यांचे नाव कमी करून त्यांच्या जागी दुसर्‍या निमंत्रण पत्रिकेमध्ये मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. 

खा. प्रभाकर कोरे यांनीही अंगडींना टोला लगावणे सोडले नाही. रेल्वे उड्डाणपुलाला खा. सुरेश अंगडी यांचे नाव देण्याची आवश्यकता आहे. हे काम पूर्ण होण्याकरिता त्यांचे श्रम कारणीभूत आहेत. ते जिवंत असले तरी त्यांचे नाव देण्यास काहीच हरकत नसल्याचा उपरोधिक टोला खा. कोरे यांनी अंगडींना मारल्यानंतर एकच हस्या पिकला.