Sat, Dec 14, 2019 05:46होमपेज › Belgaon › खा. अंगडींना मंत्रिपद, बेळगावात जल्लोष

खा. अंगडींना मंत्रिपद, बेळगावात जल्लोष

Published On: May 31 2019 1:53AM | Last Updated: May 31 2019 12:32AM
बेळगाव : प्रतिनिधी  

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खा.सुरेश अंगडी यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे शहरात भाजप कार्यकर्त्यांनी सर्वत्र जल्लोष केला. खा.अंगडी यांच्या संपीगे रोड, विश्‍वेश्‍वरय्यानगर येथील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी होती. 

खा. अंगडी यांनी विजयाचा चौकार मारल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या मंत्रिपदासाठी पाठपुरावा केला होता.  गुरूवारी दुपारी. खा.अंगडी यांना दिल्लीवरून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आल्यानंतर. शहर-उपनगरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाईचे वाटप करण्यात आले. 
भाजप महानगरतर्फे चन्नम्मा सर्कल येथील गणपती मंदिरात पूजा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खा. सुरेश अंगडी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना मिठाईचे वाटप केले. 

यावेळी भाजप महानगरचे अध्यक्ष राजेंद्र हरकुणी, आ. अ‍ॅड. अनिल बेनके, जनरल सेक्रेटरी शशी पाटील, रामू टोपण्णावर, दीपक जमखंडी, उत्तर भाजपचे अध्यक्ष श्रीनिवास बिसनकोप, महानगर उपाध्यक्ष संजय बेळगावकर, उमेश बडवाण्णाचे, हनुमंत कागलकर आदी उपस्थित होते. आ. अ‍ॅड. अनिल बेनके यांच्या कार्यकर्त्यांनी गणपती मंदिरात पूजन करुन पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या.