Tue, Dec 10, 2019 13:43होमपेज › Belgaon ›  ‘राणी चन्नम्मा’त राजकीय धुडगूस

 ‘राणी चन्नम्मा’त राजकीय धुडगूस

Published On: Oct 02 2018 1:16AM | Last Updated: Oct 02 2018 1:16AMबेळगाव : प्रतिनिधी

राणी चन्नम्मा विद्यापीठातील कार्यक्रमांसाठी आ. सतीश जारकीहोळी यांना निमंत्रित केले जात नाही, असा आरोप करीत आमदार समर्थकांनी विद्यापीठाचे कुलगुरू शिवानंद होसमणी यांना धक्काबुकी केली. तसेच विद्यापीठाच्या खिडक्यांची तोडफोड केली. गेल्या आठवड्यात खा. सुरेश अंगडींच्या हस्ते भुयारी मार्गाच्या कामाचे उद्घाटन करताना आ. जारकीहोळी हजर नव्हते. त्यानंतर हा राजकीय संघर्ष उडाला आहे.

रक्तदानाचा कार्यक्रम उधळला

चन्नम्मा विद्यापीठ आ. सतीश जारकीहोळींच्या मतदारसंघात येते. विद्यापीठाने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आमदारांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचा आरोप करीत आमदार समर्थक कार्यकर्त्यांनी विद्यापीठात धुडगूस घातला. सुमारे 70 कार्यकर्त्यांनी विद्यापीठामध्ये घुसून सुरू असलेला रक्तदानाचा कार्यक्रम उधळून लावला. तसेच कुलगुरु होसमनी यांना शिविगाळ आणि मारहाणही केली.

विद्यापीठाच्या विकासासाठी सरकारकडून निधी मंजूर करण्यासाठी आमदारांनी विशेष प्रयत्न केले आहेत. विद्यापीठाला ये-जा करण्यासाठी असणार्‍या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 50 लाखाचा निधी मिळवून दिला आहे. मग रस्ताकामाच्या उद्घाटनाला का बोलविण्यात आले नाही,  असा जाब कुलगुरुंना विचारण्यात आला. 

काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील वस्तूंची व खिडक्यांच्या काचांची तोडफोडही केली. तत्पूर्वी विद्यापीठात घुसण्यापासून रोखणार्‍या शिपायांनाही मारहाण करण्यात आली.