Thu, Dec 05, 2019 20:46होमपेज › Belgaon › मराठी भाषिक १३, इतर २० अर्ज

अब तक...३३

Published On: Apr 04 2019 1:51AM | Last Updated: Apr 04 2019 12:19AM
बेळगाव : प्रतिनिधी

मध्यवर्ती म. ए. समितीने केलेल्या आवाहनाला बुधवारी चांगला प्रतिसाद लाभला. म. ए. समितीच्या 13 जणांनी निवडणूक अधिकार्‍यांकडे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. त्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारअखेरपर्यंत सादर झालेल्या अर्जांची संख्या 33 झाली आहे. उर्वरित इच्छुक गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. गुरुवार हा उमेदवारी दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.

सीमाप्रश्‍न आणि रिंगरोड भूसंपादनाकडे देशभराचे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने 101 उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार घटक समितीने मराठी भाषिकांना आवाहन केले असून चांगला प्रतिसाद लाभला आहे. गुरुवारी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असून इच्छुकांची झुंबड उडणार आहे.

मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे सुपुत्र बुलंद दळवी यांचा म. ए. समितीतर्फे सर्वप्रथम अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर माजी नगरसेवक विजय पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी दीपक दळवी उपस्थित होते. दुपारी बारा नंतर युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, शिवराज पाटील, पांडुरंग पटण, चेतक कांबळे, उदय नाईक यांनी अर्ज दाखल केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीचे वकील अ‍ॅड. महेश बिर्जे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. इच्छुकांसह समिती कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आर. आय. पाटील, राजू मरवे, मधु कणबर्गी, गणेश दड्डीकर, बी. डी. मोहनगेकर, अ‍ॅड. एम. जी. पाटील, उदय नाईक,  माजी ता. पं. सदस्य यल्लाप्पा कणबरकर, नारायण दळवी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवारी दाखल झालेले अर्ज

विजय लक्ष्मण पाटील, बुलंद दीपक दळवी, शिवराज नारायण पाटील, धनंजय राजाराम पाटील, शुभम विक्रांत शेळके, विनायक बाळकृष्ण मोरे (अनगोळ),  पांडुरंग मल्लाप्पा पट्टण (मजगाव), लक्ष्मण भीमराव दळवी (मंडोळी), चेतक यल्लाप्पा कांबळे (अलतगे), महादेव मारुती मंगण्णाकर (मच्छे), गणेश महेश दड्डीकर(शास्त्रीनगर), उदय तुकाराम नाईक (हिंडलगा), अनिल बबन हेगडे (हिंडलगा).