Sun, Dec 08, 2019 21:45होमपेज › Belgaon › मुंबई हॉटेलविरुद्ध कायदेशीर लढा : शिवकुमार

मुंबई हॉटेलविरुद्ध कायदेशीर लढा : शिवकुमार

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 12 2019 12:29AM
बंगळूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारला कल्पना देऊन अधिकृतपणे मुंबई दौरा केला. हॉटेलमध्ये खोली आरक्षित केली. पण, सदर खोलीचे आरक्षण रद्द करण्यात आले. हॉटेलमध्ये जाण्यासाठी आपल्याला मज्जाव करण्यात आला. याविरोधात कायदेशीर लढा दिला जाणार असल्याचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

गुरुवारी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, हॉटेल व्यवस्थापनाने आरक्षित खोली स्वत:च्या मर्जीने रद्द केली आहे. पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेऊन बंगळूरला पाठवले. रात्री उशिरा बंगळूर गाठले. आपल्या पक्षातील आमदारांना त्या ठिकाणी भेटण्याची संधीही दिली नाही. हा प्रकार लोकशाही विरोधी आहे.

आघाडीतील नाराज आमदार सध्या मुंबईतील हॉटेलमध्ये आहेत. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मंत्री डी. के. शिवकुमार मुंबईला गेले होते. पण, त्यांना तेथे प्रवेश नाकारण्यात आला. सहा तास त्यांनी प्रवेशाचा प्रयत्न केला. नाराज आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण, त्यांना अपयश आले. अखेर रिकाम्या हाताने माघारी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.