Sat, Dec 14, 2019 05:39होमपेज › Belgaon › सराफ व्यावसायिकांनी हक्क जाणून घ्यावेत

सराफ व्यावसायिकांनी हक्क जाणून घ्यावेत

Published On: Jun 30 2019 1:08AM | Last Updated: Jun 30 2019 1:17AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहर परिसरातील सराफ व्यावसायिकांनी संघटित होऊन आपल्या न्याय हक्कांची जाणीव करून घेणे गरजेचे आहे. व्यवसायात काही प्रशासनाकडून चुकीचे प्रकार घडत असतील तर थेट कर्नाटक ज्वेलर्स फेडरेशनकडे संपर्क साधावा, असे आवाहन कर्नाटक ज्वेलर्स फेडरेशनचे सेक्रेटरी डॉ. बी. रामाचारी यांनी केले. 

दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशन, बेळगाव शहर सराफ व्यापारी संघ, शहापूर सराफ असोसिएशन, शहापूर दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघ, शहापूर गोल्डस्मिथ असोसिएशन, शहापूर- बेळगाव बुलियन रिफायनगर अ‍ॅण्ड असायर्स या संघटनांतर्फे आयोजित महासभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दैवज्ञ सेवा संघाचे अध्यक्ष दयानंद नेतलकर होते. व्यासपीठावर अ‍ॅड. एम. एम. शेख, वैभव वेर्णेकर होते. 

डॉ. रामाचारी म्हणाले, काहीवेळेला बाहेरील ग्राहकांकडून खरेदी केले जाणारे सोने हे खरोखर अडचण  आहे की, चोरीचा माल आहे. याबाबत खातर जमा करावी. या प्रकाराबाबत काहीवेळेला पोलिस प्रशासनाकडून विनाकारण सराफांना गोवले जात आहे. यासाठी सराफांनी कर्नाटक राज्य सरकारच्या पोलिसांना असलेल्या गाईड लाईन्स  काय आहेत? याचा अभ्यास प्रत्येकाला असावा. अ‍ॅड. एम. एम. शेख यांनी ग्राहकांद्वारे आलेल्या चोरीच्या मालाच्या खरेदीत सराफ, संशयित आरोपी होऊ शकत नाही. याबाबत त्यांनी आवश्यक कायदे व त्रुटी स्पष्ट केल्या. 

दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष वैभव वेर्णेकर म्हणाले, अलिकडील काळात सराफ व्यावसायिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या अडचणीवर कशा पद्धतीने मात करता येईल. यासाठी महासभा आयोजित केली आहे. 

दयानंद नेतलकर यांनीही मार्गदर्शन केले. सराफ व्यावसायिक दिनानाथ रेवणकर, प्रवीण रेवणकर, एकनाथ पाऊसकर, सुरेश वेर्णेकर, सुरेंद्र वेर्णेकर, माणिक अन्वेकर यांच्यासह अन्य व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

10 टक्के व्यावसायिकच हॉलमार्क परवानाधारक

महासभेला शहर उपनगरातील सर्व असोसिएशनचे बहुतांश पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यासभेत मान्यवरांनी हॉलमार्कबाबत मार्गदर्शन करून जागृती केली. शहरातील एकूण सराफी व्यावसायिकांपैकी केवळ 10 टक्केच व्यावसायिकांकडे हॉलमार्कची परवानगी आहे. बेळगाव शहरातील मार्केट दर्जेदार व नामांकित करण्यासाठी सर्व  व्यावसायिकांनी हॉलमार्क परवानगी घ्यावी. याबाबत प्रभावी मार्गदर्शन झाले.