Mon, Jan 20, 2020 09:23होमपेज › Belgaon › लक्ष्मीसेन महास्वामींचे कोल्हापुरात महानिर्वाण

लक्ष्मीसेन महास्वामींचे कोल्हापुरात महानिर्वाण

Published On: Jun 21 2019 1:10AM | Last Updated: Jun 21 2019 1:10AM
रायबाग : वार्ताहर

श्री भट्टारक पट्टाचार्य डॉ. लक्ष्मीसेन स्वामी (वय 77, रा. संस्थान मठ कोल्हापूर, मूळ-रायबाग, जि. बेळगाव) यांचे गुरुवारी पहाटे कोल्हापूर मुक्‍कामी महानिर्वाण झाले. समाजातील व्यसनाधीनता नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. देशातील विविध ठिकाणांसह विदेशातही त्यांनी प्रवचने केली. लक्ष्मीसेन विद्यापीठाच्यामाध्यमातून त्यांनी बेळगाव, कोल्हापुरात शाळा सुरु केल्या.

शुक्रवारी दुपारी 1 वा. येथील केईबी रोडवरील निषिधी आवारात अंत्यसंस्कार होणार आहेत. येथील मुख्य रस्त्यावरील जैन मठातून अंत्ययात्रा निघणार आहे. केईबी रोडवरील ‘निषिधी’ येथे अंत्यक्रिया होईल. त्याआधी सकाळी 7 ते 8 पर्यंत स्वामींचे पार्थिव शुक्रवारपेठ जैन मठ (कोल्हापूर) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. 

मराठीसह इंग्रजी, संस्कृत, हिंदी, तमिळ, कन्नड आदि भाषा त्यांना अवगत होत्या. त्यामुळे देशातील विविध भागांत प्रबोधनासाठी गेल्यानंतर स्थानिक भाषांमध्ये ते संवाद साधत. त्यांचे 70 ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यापैकी 10 ग्रंथ स्वहस्ताक्षरातील आहेत.