Sat, Dec 14, 2019 05:40होमपेज › Belgaon › कुमारस्वामींचा ‘ऑडिओ’ बॉम्ब

कुमारस्वामींचा ‘ऑडिओ’ बॉम्ब

Published On: Feb 09 2019 1:40AM | Last Updated: Feb 08 2019 10:39PM
बंगळूर : प्रतिनिधी

५० कोटी रुपये देऊन विधानसभा अध्यक्षांना बुक केले आहे. तसेच पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना बुक केले आहे. 25 कोटी रुपये तुम्हाला मिळतील असे आमिष निजद आमदाराला दाखविल्याच्या संभाषणाचा ‘ऑडिओ’ मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

कुमारस्वामी म्हणाले, गुलबर्ग्यातील गुरुमिटकल येथील नागनगौडा कंदकूर यांना आमिष दाखविण्यात आले. यामध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधीचाही हात आहे.  आमदारपुत्र शंकरगौडा यांच्याशी येडियुराप्पांनी संवाद साधला. मुंबईत नाराज आमदार एकत्र आहेत. आणखी चार दिवसांत सरकार कोसळेल, त्यामुळे वडिलांना राजीनामा देण्यास सांग, असे येडियुराप्पांनी शंकरगौडा यांना सांगितले. याबाबतची सर्व माहिती ऑडिओमध्ये आहे. दरम्यान, कुमारस्वामी यांनी विधानसभा सभापतींकडे येडियुराप्पांविरूद्ध लेखी तक्रार केली आहे.