Thu, Dec 12, 2019 22:33होमपेज › Belgaon › खानापूर ‘एपीएमसी’वर समितीचे वर्चस्व कायम

खानापूर ‘एपीएमसी’वर समितीचे वर्चस्व कायम

Published On: Nov 04 2018 1:16AM | Last Updated: Nov 04 2018 1:16AMखानापूर : प्रतिनिधी

खानापूर तालुका अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीवर (एपीएमसी) पुन्हा म.ए. समितीचे वर्चस्व राहिले. शनिवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी रामचंद्र पाटील, तर उपाध्यक्षपदी परशराम कदम यांची बिनविरोध निवड झाली.माजी आ. अरविंद पाटील यांनी पुन्हा एकदा ‘एपीएमसी’वर मराठी माणसाचे वर्चस्व कायम ठेवले.

आठ दिवसांपासून धडपडणार्‍या भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांना सूचक मिळाला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. 5 नोव्हेंबरला नियमाप्रमाणे अध्यक्ष संजय पाटील आणि उपाध्यक्षा लक्ष्मी कंग्राळकर यांचा 20 महिन्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापूर्वी ही निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आली.

भाजप, काँग्रेसची प्रयत्नांची पराकाष्ठा

भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्यांच्या सदस्यांना सूचकही न मिळाल्याने अध्यक्षपदासाठी एक व उपाध्यक्षपदासाठी एक असा प्रत्येकी एकच अर्ज आला.

निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार शिवानंद उळागड्डी यांनी काम पाहिले. यावेळी तालुका म.ए. समितीचे प्रभारी अध्यक्ष देवापान्ना गुरव, माजी आ.अरविंद पाटील, पी. एच. पाटील, मार्केटिंक सोसायटीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, तालुका म. ए. समितीचे सचिव गोपाळराव देसाई, माजी जि. पं. सदस्य पुंडलिक कारलगेकर,  एपीएमसी सदस्य मारुती गुरव, शब्बीर मुजावर, बसवराज मुगळीहाळ, खेमाजी मादार,  विजय मादार, गजानन पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.