Wed, Apr 01, 2020 12:56होमपेज › Belgaon › कानडी पोलिसांची निपाणीत घरात घुसून लोकांना मारहाण

कानडी पोलिसांची निपाणीत घरात घुसून लोकांना मारहाण

Last Updated: Mar 25 2020 10:27PM
निपाणी : पुढारी वृत्तसेवा

निपाणी शहरात बुधवारी पोलिसांनी काही लोकांना घरात घुसून बदडून काढले. त्यात उदय शिंदे (वय 62) जखमी  झाले आहेत. त्याशिवाय त्यांचा मुलगा आणि पुतण्या यांनाही पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. 

दोन मुलांचा पाठलाग करीत काही पोलिस उदय शिंदे आणि त्यांच्या भावाच्या घरात शिरले. एक पोलिस किचनपर्यंत गेला होता. त्याने घरातील मुलांना बाहेर काढून मारहाण केली. त्यानंतर उदय शिंदे यांनाही मारहाण केली. शिंदे यांनी विरोध करता त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली.  

मात्र पोलिसांचे म्हणणे आहे, की या परिसरात 10 ते 15 जण घोळक्याने जमून मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण करण्यात मग्न होते. जमावबंदी कायद्याचा भंग केला म्हणून आम्ही त्यांना सौम्य लाठीमार करून पळवून लावले. मुद्दामहून कुणालाही मारहाण केलेली नाही.